राज्यातील राजकारणात कथित व्हिडिओमुळे मोठी खळबळ
मुंबई/प्रतिनिधी:
राज्यातील राजकारणात सध्या एका कथित व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सवुमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शासकीय निवासस्थानाचा गैरवापर?
हा सर्व प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय सुविधांच्या नैतिक वापराबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये दिसणारी दुसरी व्यक्ती पवन यादव असल्याचे सांगितले जात असून, त्याच्यावर यापूर्वी खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे.
भावानेच केला व्हिडिओ सार्वजनिक?
दरम्यान, हा व्हिडिओ पवन यादवच्या भावानेच सार्वजनिक केल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नसली, तरी विरोधकांनी मात्र सरकारला धारेवर धरले आहे.
काँग्रेसची आक्रमक भूमिका
या प्रकरणानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून मंत्री झिरवाळ यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, "हे नैतिक अध:पतनाचे उदाहरण आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून असे वर्तन निंदनीय आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली टीका नोंदवली आहे.
टिप्पणी पोस्ट करा